आज पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार यांना पेन आणि डायरी चे वाटप मा श्री अशोक बनकर, प्राचार्य यांच्या संकलपनेतून वाटप करण्यात आले .या वेळी उपस्थित पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार होते .
केशव सीताराम ठाकरे (17 सप्टेंबर 1885 – 20 नोव्हेंबर 1973; जन्म केशव सीताराम पनवेलकर , ज्यांना प्रबोधनकार ठाकरे या नावानेही ओळखले जाते), हे भारतीय समाजसुधारक, लेखक आणि राजकारणी होते. अंधश्रद्धा, अस्पृश्यता , बालविवाह आणि हुंडा यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. ते एक विपुल लेखकही होते.
15 ऑगस्ट 1947 संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळाले तरी देखील मराठवाडा हा हैदराबाद या संस्थानाच्या निजामशाही अत्याचारातून मुक्त झाला नव्हता, हैदराबाद संस्थानातून मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील नागरिकांना 13 महिने संघर्ष करावा लागला.. या संघर्षासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली होती, मात्र हैदराबादचे निजाम यासाठी तयार होत नव्हते या उलट निजामांचा सेनापती काशीम रझवी जो अत्यंत क्रूर व अन्यायी होता याची रझाकार ही संघटना सामान्य जनतेवर खूप अन्याय अत्याचार करत होती. या सर्वांचा विरोध करण्यासाठी शेवटी अनेक शूरवीर मैदानात उतरले, मराठवाडा हा हैदराबाद संस्थानातून मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी जो लढा केला गेला त्यामध्ये भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानावरती ऑपरेशन पोलो लष्करी कारवाई केली आणि शेवटी ह्या कारवाईमध्ये निजामशाहीला आपली हार पत्करावी लागली 17 सप्टेंबर 1948 संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झाले आणि ह्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि त्याचबरोबर मराठवाडा देखील हैदराबाद या संस्थानांमधून मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये सामील झाला म्हणून हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी सरकारी कार्यालय तसेच शाळेच्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून ह्या लढ्यामध्ये वीरमरण आलेल्या शूरवीरांचे स्मरण केले जाते. खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळालेले दिवस म्हणजे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस या दिवसाच्या संपूर्ण भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
The little girls from Podar School created a beautiful picture of themselves for the police trainees and gave it to them as a gift.
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिन / 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात पार पाडला या वेळी राखीव पोलीस कार्यालय येथे श्री केशव गिरडकर (रापोनी )यांना ध्वजारोहण केले .आणि मा प्राचार्य कार्यालय येथे श्री विलास पाटील (प्रसाशन ) यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मुख्य कवायत मैदानवर मा श्री अशोक बनकर सर ,प्राचार्य यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. 79 वा स्वातंत्र्य दिना निमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रातील उत्कृष्ठ काम केल्या बद्दल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा मा .श्री अशोक बनकर सर यांनी श्री विलास पाटील,श्री केशव गिरडकर ,श्री अभिजित मोरे ,श्री दिपक गेडाम श्री विजय पानपाटिल ,श्री गजानन कायंदे ,श्री दिलीप फाटे ,श्री नरेश वैरागळ ,श्रीमती पुजा शिरकर यांचा प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तू देऊन सन्मानित केले . तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी सन १९७७ पासुनचे साहित्याचे निर्लेखन कामकाज करून उल्लेखनीय काम केल्याबद्दल मा श्री अशोक बनकर सर यांच्या हस्ते .श्री शरद तोटे ,श्री कुलकर्णी ,श्री कांबळे ,श्री मुळे ,श्री सद्गुरे श्रीमती भावना शेंडे ,श्री राठोड ,श्री गिरी ,श्री शेख ,श्री शिंदे ,श्री वाळके यांचा त्यांना प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तू सत्कार करण्यात आला . जालना रोटरी क्लब आणि जालना flrst चे सदस्य श्री अंकित अग्रवाल ,श्री प्रतिक नानावटी श्रीमती सुजाता नानावटी ,श्री गोविंद गोयल ,श्री कुष्णा बगडिया ,श्री राहुल अग्रवाल ,श्री यश पुरी ,श्री अयुष बन्सल श्री आदित्य बगडिया श्री उदय शिंदे तर्फे श्री अशोक बनकर ,प्राचार्य यांचा सत्कार केला आणि दुर्गामाता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .या वेळी पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार ,मंत्रालयीन कर्मचारी आणि सत्र क्र १०४ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी हजर होते.
“राखी” म्हणजे नात्यांचा सुगंधीत धागा, जेथे भगिनीचे प्रेम आणि भावाचा रक्षणव्रत एकत्र गुंफलेले असते. रक्षा बंधनाचा औचित्त साधून पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे महाराष्ट्रातील विविध २८ जिल्हयातून प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले एकूण ११५९ पोलीस प्रशिक्षणार्थी करीता दि.०८.०८.२०२५ रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदरील कार्यक्रमाकरीता श्रीमती दानकुंवर कन्या, विदयालय जालना येथील ७५ विदयार्थांनी तसेच Inner wheel club of Jalna. च्या महिला श्रीमती काजल पटेल, राखी जेथलिया, सुनीता अग्रवाल, सुवर्णा करवा, मनीषा गणात्रा कल्पना गोसराणी, छाया हंसोरा यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे मा. अशोक बनकर, प्राचार्य , १५ पोलीस अधिकारी व ६० पोलीस अंमलदार उपस्थित होते.
आज दिनांक:-01/08/2025रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
आर्थिक साक्षरता या बाबत धीरा फॉडेशन च्या वतीने श्री समीर नाईक यांनी सत्र क्र.१०४ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले .
सत्र १०४ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांची पोलीस अधीक्षक कार्यलय भेट
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 169 वी जयंती पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे उत्साहाने साजरी करण्यात आली . स्वातंत्र्य संग्रामातील एक थोर नेते, पत्रकार, शिक्षक आणि समाजसुधारक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या प्रखर घोषणेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवे बळ दिले. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी जनजागृती घडवली आणि ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा दिला. गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या सार्वजनिक उत्सवांना राजकीय आणि सामाजिक एकतेचे व्यासपीठ बनवून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. त्यांचे विचार आणि कार्य आजही स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि एकतेची प्रेरणा देतात.
आज सत्र १०४ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या करिता सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आज वाढदिवस असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांना शुभेछ्या प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले तसेच थोर पुरुष आणि राष्ट्रीय संत यांच्या जयंती वेळी मनोगत व्यक्त करणाऱ्या नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले.मा श्री अशोक बनकर प्राचार्य यांनी नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन केले .
आज दिनांक:-12/07/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना मा .श्री अशोक बनकर सर प्राचार्य यांच्या मार्गदर्शना मध्ये मानस हॉस्पिटल येथील डॉ कालिंदा उढाण यांनी ” तणाव मुक्त जीवन कशा प्रकारे जगायचे ” या विषयाचे मार्गदर्शन केले या वेळी 104 सत्रातील नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी हजर होते .यावेळी आभार प्रदर्शन श्रीमती रनेर पोनी यांनी केले .अंतरवर्ग येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते . तणाव हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम करणारा घटक असून, तो समजून घेतल्यास त्यावर प्रभावीपणे मात करता येते. या लेखात आपण तणावाचे प्रकार, त्याची कारणे आणि त्यावर मात करण्याचे मार्ग यांचा सखोल आढावा घेणार आहोत. तणावाचे प्रकार तणाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो
आज पोलीस प्रशिक्षण केंद्रात जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथील आहार तज्ञ डॉ जोशी मॅडम यांनी प्रशिक्षण केंद्रामधील पोलीस अधिकारी,पोलिस अंमलदार आणि नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी आहाराबद्दल लेक्चर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी हजर होते.
आज पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सत्र क्र.104 मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या करिता निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते .हि स्पर्धे मा श्री अशोक बनकर सर, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनामध्ये पोनी श्री रत्नदीप जोगदंड यांनी आयोजित केली.स्पर्धेतील निबंधाचे विषय खालीलप्रमाणे होते . 1. पोलीस आणि जनसंपर्काचे महत्व 2. शिस्तीतुन शक्ती निर्माण होते-पोलीस सेवेमधील शिस्तीचे महत्व 3. तंत्रज्ञान आणि पोलीस सेवा-आव्हाने आणि संधी 4. वैश्विक तापमान वाढ आव्हाने आणि उपाय 5. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पारंपारिक यंत्रणा समतोल राखण्याचे आव्हान (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि सायबर क्राईम 6. सामाजिक माध्यमांचे फायदे आणि तोटे 7. महिलांची सुरक्षितता – व्यवस्थेची की विचारांची जबाबदारी 8. नविन पीढीच्या गुन्हयांचे स्वरुप पोलीस तपास पध्दतीची नवी दिशा
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भोजनालय विभागातील पोळी विभागाकरिता नवीन शेड चे उद्घाटन हेड कुक श्री बैरागी मामा यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी मा श्री अशोक बनकर सर प्राचार्य ,श्नी पाटील सर उपप्राचार्य (प्रशासन ),श्री जऱ्हाड सर उपप्राचार्य (आंतरवर्ग ) श्री गिरडकर सर ,श्री कायंदे सर आणि मेस विभागातील सर्व पोलीस अंमलदार आणि वर्ग 4 कर्मचारी उपस्थित होते .
आज प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार आणि नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी डॉ. पियुष लोहाडे यांनी फिजिओथेरपी या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणा दरम्यान होणाऱ्या दुखापती आणि त्यावर उपचार या बद्दल माहिती दिली. (छायाचित्र :-सपोउपनि/ दिलीप फाटे )
वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचा गौरव केला…छायाचित्र सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप फाटे यांनी केले .
आज दि:-३०.०६.२०२५ रोजी मा श्री अशोक बनकर ,(प्राचार्य) अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना मध्ये सत्र .१०४ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या करिता चित्रकला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते .या वेळी पोलीस अधिकारी आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला .सदर स्पर्धाचे छायाचित्र सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप फाटे यांनी केले .
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र. जालना येथे 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी आणि नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी हजर होते.
दिक्षांत संचलन कार्यक्रम २०२५
आज छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती साजरी करण्यात आली .या वेळी मा श्री अशोक बनकर सर ,प्राचार्य यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले .तसेच पोनी विलास पाटील (उपप्राचार्य प्रसाशन ),रापोनी केशव गिरडकर आणि पोलीस अंमलदार,मंत्रालयीन कर्मचारी , नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्तीत होते
पोलीस प्रशिक्षण केंद्रात 1मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मा श्री अशोक बनकर सर, प्राचार्य यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाल्याबद्दल हेडकुक श्री बैरागी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच श्री दिलीप अंबादास फाटे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना पण पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाल्याने प्राचार्य सो यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे श्री कुलकर्णी सर सेवानिवृत्ती प्राध्यापक यांचे ताणतणाव बाबत लेक्चर पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांच्या साठी आयोजन करण्यात आले होते .
महाराष्ट्र शासनाने ‘पत्रकार दिन’ ( Journalist Day 2023 ) हा 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या ( Darpan first Marathi newspaper ) माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहेत. ( Journalist Day 2023 In Maharashtra ) बाळशास्त्री यांचा जन्म : ( Birth of Balshastri ) 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. अज्ञान, दारिद्र्य आणि रुढीप्रिय समाजाच्या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी ते मुंबईत आले. तेथे बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली.
पोलीस प्रशिक्षण केंद्र , जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली .यावेळी पोलीस अधिकारी ,अमलदार उपस्थित होते .मा श्री .अशोक बनकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन बद्दल माहिती दिली .#हिंदवी_स्वराज्य_संस्थापक #रयतेचे_राजे_महाराष्ट्राचे_आराध्य_दैवत #श्रीमंतयोगी_छत्रपती_शिवाजी_महाराजांना #त्रिवार_मानाचा_मुजरा__! जय जिजाऊ जय शिवराय___🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 (छायाचित्र :#सहापोउपनि /दिलीपफाटे)
सत्र क्र .१०३ मधील नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी यांची कारागृह भेट
सैनिक संमेलन दि:- ०५.०१.२०२५ आणि माहे नोहेंबर आणि डिसेंबर मध्ये उत्कुष्ठ पोलीस अधिकारी आंतरवर्ग ,बाह्यवर्ग पोलीस अधिकारी ,प्रशिक्षक ,नाप्रपोशि आणि स्वयंपाकि मंत्रालयीन कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले
सद्-रक्षणाय..! पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षणार्थी असलेल्या पोलिसांनी जालना शहर महास्वच्छता अभियानामध्ये अति-उत्कृष्ट योगदान दिले. प्रेरणादायी सहभाग. आज 1020+ प्रशिक्षणार्थी पोलिसांनी प्रशिक्षकांसह सहभाग नोंदवला. शहरातील 25 ठिकाणांवर पोलिस (34) तुकड्यांच्या माध्यमातून दिवस उजाडण्यापूर्वी एकाच वेळी स्वच्छता अभियान सुरू झाले. तासाभरात नियोजित ठिकाणांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. जालना शहरातील कुंडलिका सीना नद्यांचे पुनरूज्जीवन, पारसी टेकडी संवर्धन आणि जालना शहर स्वच्छता यामध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्राचे खूप मोठे योगदान राहिलेले आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांनी दिलेले निस्पृह योगदान., प्रत्यक्ष कृतीतून रूजलेले सामाजिक संस्कार यातून भविष्यात महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्था निश्चितच समजाप्रती सकारात्मक भाव असलेल्या मजबूत हातांमध्ये असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणार्थी पोलिस, प्रशिक्षक आणि सहभागी सर्वांचे मनःपूर्वक आभार.. 🙏
कोर्ट भेट दि:-१३.०१.२०२५ ते १८.०१.२०२५
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी मा श्री अशोक बनकर सर, प्राचार्य यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले आणि श्री पाटील सर (उपप्राचार्य ) प्रशासन , श्री अश्रविन जाधव रापोउपनि आणि मंत्रालयीन कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले . संत रोहिदास महाराज यांच्या बद्दल प्राचार्य सो , उपप्राचार्य सो आणि सत्र क्र. १०३ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या वेळी सूत्र संचालन श्री अंकुश शिंदे , वरिष्ठ श्रेणी लिपिक यांनी केले
आज 76 वा प्रजासत्ताक दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे अत्यंत उत्साहत साजरा करण्यात आला. रापोनी कार्यलय येथे रापोनी श्री गिरडकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्राचार्य कार्यलय येथे श्री विलास पाटील सर ( उपप्राचार्य प्रशासन ) यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच मुख्य कवायत मैदान येथे मा. श्री .अशोक बनकर सर ,प्राचार्य यांनी राष्ट्रीय ध्वजारोहण फडकावून उपस्थित पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार ,नवप्रविष्ट पोलीस शिपाई ,मंत्रालयीन कर्मचारी यांना मार्गदर्शन केले .तसेच श्री कायंदे ,पोलीस उपनिरीक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२४ (आंतरवर्ग ) आणि श्री दिपक अरमाळ ,पोलीस हवलदार यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्याने त्यांचा सत्कार व विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये श्री जोगदंड पोलीस निरीक्षक यांनी कविता वाचन उत्कृष्टपणे केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन व सत्र १०३ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले
भारताच्या इतिहासात महात्मा गांधी, नेहरू, वीर सावरकर, राम मनोहर लोहिया, बाळ गंगाधर टिळक, श्रीपाद अमृत डांगे यांसारखी प्रसिद्ध रत्ने झाली आहेत आणि जगाच्या इतिहासात सिसेरो, बर्क, शेरीडन यांसारखी प्रसिद्ध रत्ने झाली आहेत. . याच क्रमाने महाराष्ट्राला अभिमानास्पद करणारे शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक चमकणारे रत्न होते. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आजही देशभरातील राजकारणात आदराने घेतले जाते. ते केवळ नावाने नव्हे तर कृतीने हिंदू हृदय सम्राट होते. त्यामुळे त्यांची कीर्ती भारतात आणि भारताबाहेरही होती. त्यांचा जन्म एका सामान्य पण महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात चंद्रसेनिया कायस्थ प्रभू कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना संघटित करण्यासाठी त्यांनी संयुक्त मराठी चालवळ (चळवळ) मध्ये प्रमुख भूमिका बजावली. आज 23 जानेवारी 2025 ला बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती आहे. त्यासाठी शिवसेना जोरदार तयारी करत आहे.
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली या वेळी मा श्री अशोक बनकर सर, प्राचार्य यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले आणि श्री पाटील सर (उपप्राचार्य ) प्रशासन , श्री गिरडकर सर रापोउपनि आणि मंत्रालयीन कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले . क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या बद्दल प्राचार्य सो , उपप्राचार्य सो आणि सत्र क्र. १०३ मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या वेळी सूत्र संचालन श्री अंकुश शिंदे , वरिष्ठ श्रेणी लिपिक यांनी केले.
आज प्रशिक्षण केंद्रात मा. श्री अशोक बनकर प्राचार्य सो यांच्या मार्गदर्शनामध्ये सत्र क्र. 103 मधील 1183 नवप्रविष्ठ यांच्या करिता निबंध स्पर्धाचे नियोजन करण्यात आले. या वेळी पोनि रत्नदीप जोगदंड, पोनि संदीप वराडे आणि श्री राजेश गायकवाड व कवायत निदेशक जगताप मॅडम यांनी निबंध स्पर्धाचे योग्य नियोजन करून पार पडली.
आज दिनांक 18 10 2024 रोजी सत्र क्रमांक 103 मधील 1213 नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दरबार घेण्यात आलेला आहे. सदर दरबाराकरिता उपप्राचार्य अंतरवर्ग, उपप्राचार्य प्रशासन, अंतरवर्ग पोलीस अधिकारी, बाह्यवर्ग पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार आणि मंत्रालय कर्मचारी,कवायत निर्देशक हे हजर होते. सदरील दरबारामध्ये नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी मांडलेल्या अडी – अडचणीचे निराकरण करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यांना मूलभूत प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे भारत 78वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला .या वेळी मा श्री अशोक बनकर सर ,प्राचार्य यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले .अत्यंत अभिमानस्पद गोष्ट म्हणजे 78वा स्वातंत्र्य दिन हा पोलीस प्रशिक्षण केंद्राला दिवस खूप भाग्यशाली लाभला कारण आज श्री अशोक बनकर सर विशेष सेवा पदक मिळालेल्या त्यांचा सत्कार श्री विलास पाटील (उपप्राचार्य ) प्रशासन यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच श्री प्रकाश गायकवाड रापोउपनी यांना राष्ट्रपती पदक पोलीस पदक व श्री राजेश गायकवाड यांना केंद्रीय ग्रहमंत्री पदक मिळालेल्या त्यांचा सत्कार श्री अशोक बनकर सर ,प्राचार्य यांनी पुष्पगुच्छ देऊन केला .आणि महाराष्ट्र शासन विभागा मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक:-15/08/2023 पासून कार्यालीन टपाल पाठविण्यासाठी ई -ऑफिस प्रणाली कार्यन्वित करण्यात आली .तेव्हा पासून श्री दिलीप फाटे पोहवा /११६० यांनी आवक व जावक टपाल अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडीत असल्याने त्यांचा श्री अशोक बनकर सर ,प्राचार्य यांनी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरकरण्यात आला . वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे दि:-27/08/2024 रोजी सत्र क्र.101व 102(चालक ) नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दिक्षांत संचलन कार्यक्रम पार पडला .परेड मध्ये एकूण आठ प्लाटून होते.परेड कमांडर म्हणून नप्रपोशी -राहुल संभाजी कदम ,मूळ घटक मुंबई शहर व सेंकद इन परेड कमांडर नप्रपोशी-सोनू बाळू बच्छाव , मूळ घटक मुंबई शहर यांनी काम पहिले या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री विरेंद्र मिश्र (भा.पो .से )विशेष पोलीस महानिरीक्षक ,छत्रपती संभाजी नगर हे उपस्थित होते .तसेच विशेष उपस्थिती म्हणून मा.डॉ.श्रीकुष्णनाथ पांचाळ (भा.पो.से )जिल्हाधिकारी,जालना ,मा श्री अजयकुमार बन्सल (भा.पो.से.)पोलीस अधीक्षक जालना आणि मा.श्री आयुष नोपाणी (भा.पो.से ) अपर पोलीस अधीक्षक जालना नुतनदीदी (समाजसेविका )समस्त महाजन संस्था हे होते .प्रशिक्षणार्थी यांनी प्रमुख पाहुण्यांना मुख्य कवायत मैदानवर मानवंदना दिली .प्रमुख पाहुणे मा.श्री विरेंद्र मिश्र (भा.पो .से )विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी परेडचे निरीक्षण केले.यावेळी मा श्री अशोक बनकर ,प्राचार्य यांनी सत्र क्र. सत्र क्र.101व 102(चालक ) मधील एकूण ८३० प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली .त्यांतर शिस्तबद्ध परेड संचलन करण्यात आले. मा प्राचार्य यांनी अहवाल वाचन केले.राष्ट्रपती पदक प्राप्त रापोउपनि प्रकाश गायकवाड आणि नुतनदीदी (समाजसेविका )समस्त महाजन संस्था यांनी पो.प्र केंद्रात पाण्याचे नियोजन केल्या बद्दल यांचे सन्मानचिन्ह व प्रश्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला .तसेच आंतरवर्ग आणि बाह्यवर्गात विशेष प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थी यांना मा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मा.डॉ.श्रीकुष्णनाथ पांचाळ (भा.पो.से )जिल्हाधिकारी,जालना यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तसेच मा.श्री विरेंद्र मिश्र (भा.पो .से )विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी प्रशिक्षणार्थीना नवीन सुधारित कायदे ,सायबर क्राईम ,आर्थिक गुन्हे या बाबत. अद्यावत ज्ञान घेण्याचे मार्गदर्शन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रशिक्षणार्थी यांनी लेझीम पथक ,फोर्स वन चे शस्त्र हताळणी आणि आदिवासी नृत्याचे संस्कुतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन श्री अशोक पावर आंतरवर्ग यांनी केले.सदरील कार्यक्रमासाठी आंतरवर्ग व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार ,कार्यलयीन कर्मचारी व वर्ग 4 कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम सुरळीत पार पाडला .
पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे माननीय श्री प्रवीण पडवळ प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे भेट
आज जागतिक योग दिनानिमित्त मा श्री अशोक बनकर (प्राचार्य ) यांच्या मार्गदर्शना मध्ये निरामय योग व निसर्गोपचार संस्था ,जालना यांच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथील पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार व नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग पळवूया शरीरातील सर्व रोग आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा
पोलिस प्रशिक्षण केन्द्र ,जालना या परिसरातील मा श्री अशोक बनकर सो प्राचार्य यांच्या मार्गदर्शन मध्ये सौ.नूतन देसाई,विश्वस्त ,समस्त महाजन,मुंबई. यांच्या सहयोगाने विहीर पुर्ननिर्माण कार्याचा लोकसहभागातून शुभारंभ आज दिनांक १० मे 2024 रोजी शुक्रवार.सकाळी 0९:00 वाजता पार पडला यावेळी प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार आणि नप्रपोशी हजर होते
पोलीस प्रशिक्षण केंद जालना येथे महाराष्ट्र राज्याचा 65 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा “शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगवणारे माझे महान असे राष्ट्र, महाराष्ट्र… महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..
आज दिनांक :-१४/०३/२०२४ रोजी श्री.छत्रपती संभाजी उद्यान जालना या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय ध्वज १५० फुट उंचीचे स्तभाचे अनावरण सोहळा निमित्त भारतीय ध्वज तिरंगा रॅलीमध्ये मा श्री .अशोक बनकर प्राचार्य यांच्या मार्गदर्शना खाली सहभाग नोंदवला .ध्वज अनावरणासाठी मा.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि मा .जिल्हाधिकारी श्री डॉ .श्री कृष्णनाथ पांचाळ भा.पो.से यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज १५० फुट ध्वज अनावरण करण्यात आले. यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथील बाह्यवर्ग पोलीस अधिकारी, कवायत शिक्षक आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी मोठ्या संखेने आणि उत्साहात सहभाग घेतला . कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृ भूमी के शान का है हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा नशा ये भारत के शान का है
आज दि:- 07/03/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे NDRF टीम पुणे येथील टीम प्रमुख पोनी श्री सुशांत सेटी आणि टीम यांनी सत्र क्र.101 नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांना आपत्ती व्यवस्थापना बद्दल माहिती आणि प्रथमोपचार कशा प्रकारे करावा या बद्दल मार्गदर्शन केले .यावेळी आंतरवर्ग पोलीस अधिकारी उपस्थित होते .
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली .या वेळी मा श्री अशोक बनकर प्राचार्य यांनी पुष्पहार अर्पण करून माहिती दिली .पोलीस अधिकरी ,अमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी हजर होते . ‘काय करून ऱ्हायला रे ?’ ‘न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !’ ‘अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?’ ‘देवाचच लेकरू हाय !’ ‘आन तूह लेकरू ?’ ‘माह व्ह्य ना जी !’ ‘आन तू कोनाचा रे ?’ ‘मी माह्या बापाचा न जी !’ ‘म्हन्जे शेवटी कोनाचा ? ‘देवाचं लेकरू !’ ‘मंग तूह लेकरू बी देवाचच न ? ‘हो जी !’ अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.
पोलीस प्रशिक्षण केंद जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली .यावेळी पोलीस अधिकारी ,अमलदार उपस्थित होते .मा श्री .अशोक बनकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन बद्दल माहिती दिली .#हिंदवी_स्वराज्य_संस्थापक #रयतेचे_राजे_महाराष्ट्राचे_आराध्य_दैवत #श्रीमंतयोगी_छत्रपती_शिवाजी_महाराजांना #त्रिवार_मानाचा_मुजरा__! जय जिजाऊ जय शिवराय___🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पोलीस प्रशिक्षण केद्र,जालना येथे दि:- 14/02/2024 रोजी सत्र क्र.98,99,व 100नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत संचलन कार्यक्रम पार पडला परेड मध्ये एकूणआठ प्लाटून होते .परेड कमांडर म्हणून नप्रपोशी /वरून प्रमोद मेरगुवार,नागपूर ग्रामीण व सेकंद इन परेड कमांडर नप्रपोशी /आशिष चंदू चिताडे ,गडचिरोली यांनी काम पहिले .यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.विरेंद्र मिश्रा (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.तसेच विशेष उपस्थिती मा.श्री.अजयकुमार बन्सल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक जालना आणि मा.श्री आयुष नोपाणी (भा.पो.से.) उपस्थित होते.प्रशिक्षणार्थी यांनी प्रमुख पाहुण्यांना मुख्य कवायत मैदानवर मानवंदना दिली यावेळी प्राचार्य श्री अशोक बनकर यांनी सत्र क्र.98,99व 100 मधील ११८४ प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री.विरेंद्र मिश्रा (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांनी प्रशिक्षणार्थीना नवीन सुधारित कायदे ,सायबर ,क्राईम ,आर्थिक गुन्हे या बाबत अद्यावत ज्ञान घेण्याची मार्गदर्शन केले तसेच आगामी काळात होणारे लोकसभा ,विधानसभा निवडणूक ,आरक्षण इत्यादी बंदोबस्ताबाबत अवगत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमा साठी जालना शहरतील उद्योजक ,प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक ,पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी पोलीस अमलदार हे उपस्थित होते.
पोलीस प्रशिक्षण केंद ,जालना येथील सत्र क्र.98 ,99 व 100 मधील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचा दीक्षांत समारंभ कवायत ची रंगीत तालीम अत्यंत उत्कुष्ट्र रित्या घेण्यात आली .यावेळी मा .श्री अशोक बनकर साहेब (प्राचार्य ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .प्रमुख पाहुणे यांना मानवदन देण्यात आली .तसेच प्रमुख पाहुणे यांनी परेड चे निरीक्षण करून नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन पर भाषण केले.यावेळी सर्व पोलीस अधिकारी ,कवायत प्रशिक्षक हजर होते .आभार प्रदर्शन श्री सतिश जाधव (उपप्राचार्य ) आंतरवर्ग यांनी केले
आज ७५ वा प्रजासत्ताक दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे अत्यंत उत्साहत साजरा करण्यात आला. रापोनी कार्यलय येथे रापोनी श्री गिरडकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्राचार्य कार्यलय येथे श्री घुगे सर ( उपप्राचार्य प्रशासन ) यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच मुख्य कवायत मैदान येथे मा. श्री .अशोक बनकर सर प्राचार्य यांनी राष्ट्रीय ध्वजारोहण फडकावून उपस्थित पोलीस अधिकारी ,पोलीस अंमलदार ,नवप्रविष्ट पोलीस शिपाई ,मंत्रालयीन कर्मचारी यांना मार्गदर्शन केले .
मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. आज दिनांक:-03.01.2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी मा श्री .अशोक बनकर प्राचार्य यांनी पुष्पहार अर्पण केले .उपस्थित पोलीस अधिकारी ,अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी आणि नवप्रविष्ठ पोलीस शिपाई हजर होते.
आज रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथील कार्यालयीन शिपाई श्रीमती विमल बाळू साठे नियमित वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा श्री अशोक बनकर सर प्राचार्य यांनी शाल ,श्रीफळ ,साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी ,पोलीस अमलदार मंत्रालयीन कर्मचारी हजर होते .
संपूर्ण भारतात आज पहिल्यांदा *वीर बाल दिवस* साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे मा. श्री अशोक बनकर सर प्राचार्य यांनी वीर बाल दिवस निमित गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून मार्गदर्शन केले .या वेळी पोलीस अधिकारी ,पोलीस अमलदार मंत्रालयीन कर्मचारी आणि नवप्रविष्ट पोलीस अंमलदार उपस्थित होते .
आज दिनांक:-15/१२/२०२३ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना मा .श्री अशोक बनकर सर प्राचार्य यांच्या मार्गदर्शनमध्ये मानस हॉस्पिटल येथील डॉ कालिंदा उढाण यांनी ” तणाव मुक्त जीवन कशा प्रकारे जगायचे ” या विषयाचे मार्गदर्शन केले या वेळी 98,99आणि 100 सत्रातील नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी हजर होते .यावेळी अंतरवर्ग येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते
आज दिनांक:-०८/१२/२०२३ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी मा श्री .अशोक बनकर प्राचार्य यांनी पुष्पहार अर्पण केले .उपस्थित पोलीस अधिकारी ,अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी आणि नव प्रविष्ठ हजर होते
आज दिनांक:-०७/१२/२०२३ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना मा .श्री अशोक बनकर सर प्राचार्य यांच्या मार्गदर्शन खाली मस्त्योदरी महाविद्यालय जालना येथील श्री मोहन शिंदे प्राध्यापक यांनी ” व्यक्तीमत्व विकास ” या विषयाचे मार्गदर्शन केले या वेळी 98,99आणि 100 सत्रातील नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी हजर होते .यावेळी पोनी पावर सपोनि सानप ,भातनाते पोउपनि खरात,कायंदे,आढाव उपस्थित होते
आज दिनांक:-०६/१२/२०२३ रोजी मा .श्री अशोक बनकर सर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे फॉरेन्सिक आणि फिंगर प्रिंट या बद्दल सत्र 98,99 आणि 100 मधील नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांना मार्गदर्शन केले . या वेळी पो नि पवार ,सपोनि सुभाष चेके , पोउपनि कायंदे आणि फॉरेन्सिक तज्ञ श्री राठोड ,श्री जैस्वाल योग मार्गदर्शन केले .
आज दिनांक:-05/12/2023रोजी मा श्री अशोक बनकर सर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय डाक विभाग आणि ICICI बँक तर्फे नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांच्या साठी आर्थिक साक्षरता व नियोजन कशा प्रकारे करायच या बद्दल मार्गदर्शन शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे सत्र क्र.98,99 आणि 100 मधील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना पंचनामा कशा प्रकारे करतात या बाबत चे प्रात्यक्षिक पो नि पवार यांनी समजून सांगितले .या वेळी अंतर वर्ग पोलीस अधिकारी हजर होते
आज दिनांक:-०२.१२.२०२३ रोजी मा श्री .अशोक बनकर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे प्रशिक्षणार्थी यांच्या समस्या जानून घेण्यासाठी सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .
राष्ट्रीय एकता दिवस शपथ* दिनानिमित्त आज पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे शपथ घेण्यात आली .यावेळी उपस्थित यांना श्री सुधीर खिरडकर ,उपप्राचार्य (प्रशासन) यांनी शपथ वाचन केले .यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नप्रोपोशी हजर होते .
दक्षता जनजागृती सप्ताह” च्या अनुशंगाने आज दिनांक:-30.10.2023 रोजी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतीज्ञ घेण्यात आली .
आज दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावनाशपथ घेण्यात आली. यावेळी उपप्राचार्य श्री खान सर( आंतरवर्ग )यांनी पोलीस अधिकारी,अंमलदार तसेच नप्रपोशि पोलीस शिपाई शपथ दिली.
76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे मुख्य कवायत मैदानावर मा श्री डॉ राहुल खाडे ( प्राचार्य ) यांच्या हस्ते तसेच प्राचार्य कार्यलय येथे मा श्री सतीश जाधव उपप्राचार्य ( प्रशासन) आणि राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय येथे राखीव पोलीस निरीक्षक श्री गिरडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालय कर्मचारी उपस्थित होते
पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे मेरीमाटीमेरादेश या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांना पंचप्रणशपथ देण्यात आली. माझी माती माझादेश मातीलानमनवीरांनावंदन MeriMaatiMeraDeshआज
आज दिनांक 01/08/2023 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना, येथे दि. १७-०७-२०२३ रोजी सत्र क्र- ९७ नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणाथ्री यांचा दीक्षांत संचलन कार्यक्रम पार पडला. परेड मध्ये एकूण ६ प्लाटून होते.
पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे,अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ राहुल खाडे प्राचार्य तसेच उपस्थित पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांनी “लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती” निमित्त, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दि.०१-०५-२०२३ सोमवार रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन व कामगार दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे साजरा करण्यात आला व महाराष्ट्र गीत सामोहिक गायन केले . मा श्री अभय डोंगरे प्राचार्य यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस अधिकारी व अंमलदार व नवप्रविष्ट पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित राहिले
आज जागतिक योग दिनानिमित्त आर्ट ऑफ लिविंग परिवार जालना यांच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथील पोलीस अधिकारी अंमलदार व नप्रपोशी यांच्याकरिता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा श्री डॉ राहुल खाडे सर प्राचार्य तसेच अपर पोलीस अधीक्षक बीड श्री पांडकर सर उपस्थित होते
दीक्षांतसंचलनकार्यक्रमास प्रतिसाद :पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे मंगळवारी आयोजित सत्र क्रमांक 96 चालक बॅचचा दीक्षांत संचालन कार्यक्रम पार पडला. परेडमध्ये सहा प्लाटून होते परेड कमांडर म्हणून चापोशी विभीषण संभाजी केंद्रे यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अक्षय शिंदे पोलीस अधीक्षक जालना यांची उपस्थिती होती. परेडच्या प्रशिक्षणार्थी यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी प्राचार्य अभय डोंगरे यांनी प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली. कार्यक्रमासाठी रापोनि नांदेडे, पोउपनि गायकवाड, पोउपनि, यादव, प्रशिक्षक सचिन सोनकांबळे, दिलीप फाटे ,दीपक आरमाळ सिद्धू ढवळे जे एस फारुकी, जी एस चव्हाण, एम आय नारियलवाले, जीआर बरकूट, एम एस शेख, जीएफ राठोड, शहा, जी एम अहमद, जी बी नवले, आरडी घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.
भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज जयंती प्राचार्य कार्यालय येथे साजरी करण्यात आली.शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे
EXPO 2022 JALNA येथे वेपन बद्दल माहिती देताना राखीव पोलीस उपनिरीक्षक बी एच जाधव सर सोबत कवायत शिक्षक घोरपडे सर, गायकवाड सर ,लतीफ सय्यद सर आणि सय्यद सर
जागतिक एड्स दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक एड्स दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना परिसरात रॅली काढण्यात आली
सद्भावना प्रतिज्ञा आणि स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले
अंतरवर्ग येथे राष्ट्रगीत गाताना पोलीस अधिकारी
प्राचार्य कार्यालय येथे राष्ट्रगीत गाताना पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालयान कर्मचारी
राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय येथे राष्ट्रगीत गाताना अधिकारी अमलदार
75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 10 KM दौड मेडल स्वीकारताना अधिकारी व व अंमलदार
Independence Day Celebration 2022
दानकुवर राष्ट्रीय हिंदी कन्या विद्यालय जालना
राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना
पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जालना
राजश्री शाहू इंग्लिश मीडियम जालना
RYAN INTERNATIONAL SCHOOL JALNA
आजादी का अमृत महोत्सव
आजादी का अमृत महोत्सव
Har Ghar Tiranga
Annabhau Sathe Jayanti
PSU-II प्रशिक्षण सत्रा मध्ये बाह्यवर्गाचे प्रशिक्षण घेतांना पोलीस अंमलदार
Sirominial Pared
Plantation
जलयुक्त शिवार प्रकल्प
MS-CIT Books Distribution
Campus Buildings